महानगरपालिकेचे निकाल लागले त्यातच सत्ताधारी भाजप व शिवसेना (शिंदे )यांना जे यश मिळालं ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारां चे पक्षाला मिळालं नाही आणि विरोधातील शिवसेना (उ.बा .ठा.) व काँग्रेस यांना मिळालेल्या जागेच्या स्पर्धेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार )फार मागे म्हटल्यापेक्षा स्पर्धेतूनच बाहेर असल्याचे चित्र आहे पण मीडिया असो की सोशल मीडिया या संपूर्ण निवडणुकीची मांडणी एकाच नावाची सभोवताली करत आहे ते म्हणजे शरद पवार आणि त्यांचा पक्ष दोन्ही राष्ट्रवादी एक होणार अशी अफवा पसरून मतदारांच्या मनातील विरोधी पक्षाची जागा या पक्षास मिळाली नाही आणि सत्तेतल्या अजित पवारांपेक्षा भाजप किंवा शिवसेना यांनाही मतदारांनी पसंती दिली.
महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोड कोणतीही घडो त्यात शरद पवार हे नाव जोडले की त्या बातमीस महत्त्व येते व आजही ती बातमी टीआरपी मध्ये चालते लोगोलग विरोधक ,विश्लेषक घाईघाईने शरद पवार यांचे राजकारण व पक्षावर ब्रेकिंग न्यूज चे नावाखाली स्वतःचे विश्लेषण पेरतात .स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात त्यात स्थानिक प्रश्न ,कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यानुसार ,स्थानिक प्रश्नानुसार काही आघाडी युती केल्या जातात .हे पूर्वीपासूनच चालत आले महाराष्ट्रातही सत्ताधारी व विरोधातील पक्षांनी अनेक ठिकाणी आघाडी युती केली यातील उच्चांक तर या एम आय एम व भाजप यांनी सुद्धा समझोता केला .दोन कट्टरवादी परस्परविरोधी कुठेतरी सत्तेसाठी काहीही करतात त्याची जेवढी चर्चा व्हायला पाहिजे त्यापेक्षा पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढले याचीच चर्चा .

दोन राष्ट्रवादी एक होणार या बातमीचा परिणाम हा झाला की मतदाराने विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही राष्ट्रवादी पेक्षा इतर पक्षांना पसंती दिली या पूर्ण निवडणुकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब पत्रकार परिषद ,कुठे प्रचार सभा यात दिसले नाही यातूनच अर्थ समजण्यासारखा आहे ज्या मुद्द्यावर पक्ष फुटला तो मुद्दा पवार साहेब जोपर्यंत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे व सक्रिय आहे तोपर्यंत तरी भाजपसोबत असलेल्या पक्षासोबत ना तडजोड ना विलीनीकरण ह्या फक्त बातम्या .
15 जानेवारीला बुलढाणा येथील पक्षाचे विस्तारित कार्यकारिणीचे बैठकीत पक्षाचे आगामी दिशेचे डॉ. राजेंद्र शिंगणे साहेबांनी सुतोवाच करताना धुरंधर मधील एक डायलॉग वापरून अनेक प्रश्नांची उत्तरे दिली “घायल हूं इसलिये घातक हू ” .
जसे राष्ट्रवादीची विलीनीकरण च्या चर्चा राज्यभर चर्चेला जातात तसेच बुलढाणा जिल्ह्यात डॉक्टर शिंगणे साहेबांबद्दल चर्चांचे कट्टे आणि विश्लेषण रंगताना दिसते.
या सगळ्या गदारोळात ,पवारांचं राजकारण संपलं म्हणणारे अजुनही तासंनतास पवारांवर विश्लेषण करतात त्यां विश्लेषक भविष्यकारांचं करावं तेव्हड कौतुक कमीच ……

