बुलढाणा -विद्यार्थी एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहून प्रेरित होतो आणि स्पर्धा परीक्षा ची तयारी करायला लागतो. त्यामध्ये पुणे सारख्या ठिकाणी येऊन स्पर्धा परीक्षा ची तयारी करतो . त्यामध्ये मग कुणी 4 तास अभ्यास करतो 8 तास अभ्यास करतो. अभ्यास करणे म्हणजे फक्त सिल्याबस वाचन नव्हे. तुम्ही किती तास अभ्यास केला यापेक्षा तुम्ही त्यातलं किती वेचलं हा महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला मनाला वाटते की आम्ही एवढ्या तास अभ्यास केला परंतु हा फक्त आभास आहे, तुम्ही त्यातलं किती वेचलं हाच खरा तुमचा अभ्यास आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि आभास मधला फरक समजावून घेणं गरजेचे आहे असे मत प्रा.गणेश कड, गणेश कड एकेडमी, पुणे चे संचालक यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र बुलढाणा व शिवराय शिक्षण संस्था अंत्रि तेली यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वी भव: गुणवंतांचा सत्कार सोहळा व मार्गदर्शनाच्या निमित्ताने बुलढाणा येथे दिनांक 29 जून 2025 रोजी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्राचे अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे तर शुभ हस्ते आमदार धीरज लिंगाडे होते.
जिल्ह्यातील एमपीएससी, यूपीएससीच्या माध्यमातून अलीकडच्या काळात निवड झालेल्या अ व ब वर्गातील उमेदवारांचा सत्कार व तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट इमारत, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी खास गणेश गड अकॅडमी ,पुणे येथील प्रा. गणेश कड सर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महामानवांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविकामध्ये नरेश शेळके सचिव, यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, बुलढाणा यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा सत्कार करताना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना त्यांच्या हातून सर्वसामान्यांना न्याय देत असताना त्यांच्याकडून राष्ट्र निर्माण कार्यात मोलाचे योगदान द्यावे व यांच्या कडून प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थ्यांनी देखील आपल्या यश संपादित करावं यासाठी पेरणा व मार्गदर्शन यशस्वी भव: कार्यक्रमातून मिळावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी आमदार धीरज लिंगाडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही धोरणाच्या माध्यमातून अन्याय होतो त्या त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून यांच्यासाठी आवाज उठवून वेळोवेळी त्यांना न्याय मिळवून दिला आहे. भविष्यात देखील या सर्व विद्यार्थ्यांना मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले की स्पर्धा परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत यांना मिळालेले हे यश हे नियमित आणि स्थिर अभ्यास व परिश्रम केल्यामुळे मिळालेले आहे. सहजासहजी कोणालाही काहीच मिळत नाही आणि परिश्रम व मेहनतीला शॉर्टकट नाही, त्यामुळे आपण सर्वांनी गुणवंतांचा आदर्श घेत आपले इच्छित ध्येय साध्य करावे.
सुरुवातीला जिल्ह्यातील एमपीएससी यूपीएससी च्या माध्यमातून निवड झालेल्या सर्व अधिकाऱ्यांचे सन्मानपत्र पुस्तक व गुच्छ देऊन मान्यवरांनी स्वागत केले. शिवाय बारावी मध्ये बोर्डाच्या परीक्षेत आपापल्या कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे देखील सन्मानपत्र व पुष्प देऊन स्वागत केले व त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी विशेष सत्कार म्हणून साखळी बु जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेली इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कु.सिद्धी राजू सोनवणे हिचा करण्यात आला. सिद्धीने वडिलांची गरिबी व कौटुंबिक अडचणीला आपल्या प्रगतीला बाधा न बनवता चिकाटी व मेहनतीच्या जोरावर वयाच्या अवघ्या नव्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वात कठीण कोकण कडा हे शिखर सर करून इंडिया ग्रीनीज बुक ऑफ रेकॉर्ड नाव नोंदविला आहे. या चिमुकलीचा सन्मानपत्र देऊन सत्कार करताना उपस्थितांची छाती अभिमानाने भरून आली. तिच्या उज्वल भविष्यासाठी देखील तिच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभे राहावं अशी आशा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचे प्रा.रामकृष्ण मस्के ,डॉ.अण्णासाहेब मळसणे, रणजीत सिंग राजपूत ,ज्ञानेश्वर वायाळ ,डॉ.विजयाताई काकडे, उर्मिलाताई बावस्कर , विजय गवारगुर, अशोकराव निकम, सुरेशजी देवकर ,डॉ.गायत्रीताई सावजी, प्रा.ज्योतीताई पाटील ,डॉ.ज्योतीताई खेडेकर, ह भ प शंकर महाराज प्रा.अंजली गाढे ,प्रा.सचिन खरे, प्रा.रवींद्र गाडेकर ,प्रा.दीपक आमले ,प्रा.आर डी जाधव, प्रा.गजानन चौधरी, प्रा.तरमळे, प्रा.चव्हाण , मीनाक्षी सरदेशमुख यांनी परिश्रम घेतले. यावेळी पीएम जाधव, भगवानराव शेळके, तुळशीराम काळे ,नसीम शेठ, नाझीमाताई खान ,माजी सभापती लक्ष्मीताई शेळके ,नलिनी टापरे, अनिल कोळसे ,खांडवे सर ,हरिदास अंभोरे, पुरुषोत्तम पडघान, काकडे साहेब, गोपाळराव देशमुख, गजानन भिवसनकर, विश्वासराव शेळके, शिवदास शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते